प्रकाशित साहित्य
“सकल शास्त्रांच्या अभ्यासात जरी मोठी गती आली तरी गुरुकृपेवांचून ते शास्त्रज्ञान (सारस्वत) अननुभवी अशा स्वरूपाचे असल्यामुळे पांगळेच होय.
गुरुकृपेविना कोणतीही विद्या शुद्ध असू शकत नाही.”
- संत श्री बाबामहाराज आर्वीकर

Devotion: An Infinite Journey(Part 1)
हे पुस्तक पू. बाबामहाराज यांच्या दिव्यामृतधारा या ग्रंथाचे संक्षिप्त विवेचनात्मक संकलन आहे. भगवद्गीतेतील ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग यांच्या विविध व्याख्यांवर इंग्रजीत विपुल साहित्य उपलब्ध असले तरी, योग-भक्तीपरंपरेचे नाथमतातील तत्त्वज्ञान आत्मसात करून, हठयोगाच्या दृष्टिकोनातून गुरु-कृपेचे अद्वितीय रहस्य उलगडणारे—बाबा महाराज यांच्या दिव्यामृतधारा हा एक सखोल अद्वितीय, अतिशय सूक्ष्म आणि मनोभावे अंतर्दृष्ट देणारा ग्रंथस्रोत आहे.
या पुस्तकात मानवी जीवन, संसारधर्म आणि अध्यात्ममार्ग, खऱ्या गुरूचे स्वरूप, साधकाची विविध टप्पे, उपासना-साधनांच्या भिन्न पद्धती—त्यांची गुंतागुंत किंवा सहजता, द्वैत-अद्वैत, गुरूविषयीची प्रीती, गुरु-कृपा, लक्ष्याभिमुख भक्ती, समर्पण, अहंकाराचे गुरुतत्त्वात विलयन, गुरु-भक्ती,
तसेच “मुक्ती ही भक्तीचा अंतिम लक्ष्य नाही” ही सूक्ष्म समज—या सारख्या अनेक विषयांचा सखोल उहापोह करण्यात आला आहे. दैवाशी ऐक्य प्राप्त झाले तरी अखंड भक्तीमध्येच राहणे आवश्यक आहे, कारण भक्ती ही गुरू-शिष्यांतील प्रेमाची दिव्य अमृतधारा आहे. अशा अनेक गंभीर आणि गूढ विषयांचे सुंदर स्पष्टीकरण या या पुस्तकातून वाचकांना लाभते.
Awakening Light
या पुस्तकात साधकांसाठी पू. बाबामहाराज यांनी दिलेल्या १०० इंग्रजी अनुवादित बोधवचने समावेश आहे.

मी पाहिलेले बाबा
पू. बाबामहाराज आर्वीकर यांच्या हृद्य आठवणींचा संचय.
या पुस्तकातील कथा सध्या इंग्रजीत अनुवादित केल्या जात आहेत. ते वाचण्यासाठी, आमच्या इंग्रजी ब्लॉगला भेट द्या!

