top of page

साधका ! अवधान दीजे !!

आध्यात्मिक कार्य आणि साधना करणारा साधक कसा असावा याबाबत पू. बाबांनी केलेले मार्गदर्शन.

तुमच्या गरजा कमीत कमी करा.

परिस्थितीशी आपले जुळते-मिळते ठेवा.

कोणत्याहि वस्तूवर किंवा व्यक्तीवर अवलंबून राहू नका.

तुमच्याजवळ जे आहे ते इतरांत सारखे वाटून घ्या.

दुसऱ्याच्या सेवेकरितां नेहमी तयार रहा. आत्मभावानें सेवा करण्याची एकही संधी दवडू नका.

अकर्ताभाव व आत्मभाव यातच मन रमवा.

मोजके आणि गोड शब्द बोला.

ईश्वर समजून घेण्याची ज्वलंत इच्छा मनात ठेवा.

तुमच्या मालकीच्या वस्तूंना विसरून ईश्वराला शरण जा.

१०

ईश्वराला शरण जाण्याकरितां गुरूची फार आवश्यकता आहे.

११

फार शांतता व चिकाटी असू द्या.

१२

अभ्यास एकही दिवस सोडू नका.

१३

तुम्ही स्वतःच मार्ग आक्रमण केला पाहिजे. गुरु फक्त मार्ग दाखवतील. 

१४

जीवन फार थोडें आहे. केव्हा मृत्यू येईल याचा नेम नाही. योगसाधनेचा कसून अभ्यास करा.

१५

तुमच्या नैतिक व आत्मिक विकासाची रोजनिशी करा व त्यांत रोजच्या प्रगतीची किवा चुकांची सत्यपणे नोंद करीत चला.

१६

साधनेकरितां वेळच मिळत नाहीं म्हणून तक्रार करूं नका. झोप आणि अति बोलणें कमी करा. नेहमीं ब्राह्ममुहूर्तावरच साधना करा.

१७

मनांत ईश्वराचे किंवा 'सत्या'चे विचार पक्के करून जगाला विसरून जा.

१८

तुम्ही कुणी अमुक व्यक्ती आहांत हे विसरून जा. तसेंच तुम्ही पुरुष किंवा स्त्री आहांत वगैरे गोष्टी जोराने ब्रह्मचिंतन करून विसरून जा.

१९

आज करणें शक्य असेल तर ती गोष्ट उद्यावर टाकू नका.

२०

तुमच्या कर्तृत्वाबद्दल आणि पात्रतेबद्दल गर्व करून त्याचें प्रदर्शन करूं नका. नेहमीं साधे व शांत असा.

Terms & Conditions

Privacy Policy

Accessibility Statement

©2035 by Shashwat Sangati. Powered and secured by Wix

bottom of page