top of page
loader,gif
IMG_3165.heic

जे स्वतःला व विश्वास नित्य अंतर्मुख आहेत व आपल्यातील होणाऱ्या सर्व फेरबदलांची कार्य कारण व्यवस्था जाणून घेतात, जे नित्य चेतनशीलतेसच अभिमुख असतात, त्यांचा मी मित्ररूपाने “सांगाति” असतो असे स्वयं सर्वसुखधाम भगवंत सांगत आहेत.

- श्रीसंत बाबामहाराज आर्वीकर

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ह्या श्री ज्ञानेशांनी कथिलेल्या संतत्वाचा श्रीबाबांचे ठिकाणी नित्य जागर होता. महाराष्ट्र भूमंडळात एका नव्या धर्मजागरणाची प्रार्थना प्रभात त्यांचे करवी प्राचीकड़े आरक्त वर्णांकित सुचिन्हांनी मंडित झाली आहे. त्यांच्या दिव्यामृतधारा हया ग्रंथातील अमृतधारांच्या वर्षावामुळे शतकानुशतके श्रद्धाशील साधक वर्ग न्हाऊन आपापले अंगदोषांची सहज निष्कृति व श्रीगुरुचरणाची मधुरारती साधणार आहेत.

- प.पू श्री वामनराव गुळवणी महाराज

संत श्री बाबामहाराज आर्वीकर

प. पू. बाबामहाराज आर्वीकर हे नाथ परंपरेतील एक महान संत होत (१९२५ - १९७१). त्यांचे कार्य प्रामुख्याने माचणूर (जि. सोलापूर) येथे होते, जिथे त्यांनी मोक्षधाम आश्रमाची स्थापना केली.* पू. बाबांनी एक असाधारण ग्रंथरचना केली आहे, ज्यात त्यांनी अध्यात्माच्या गहन रहस्यांवर सविस्तर लेखन केले असून, प्रत्येक साधकाला, तो कोणत्याही पंथाचा किंवा मार्गाचा असो, त्याच्या स्वतःच्या मार्गावर मार्गदर्शन केले आहे. त्यांचा हा ग्रंथ, 'दिव्यामृतधारा', ज्ञानेश्वरीच्या १२ व्या अध्यायावरील भक्तियोगावरील सखोल, रहस्यमय टीका आहे.


कृपाळूपणा, क्षमाशीलता, कारुण्य, प्रासंगिक कठोरता असे अनेक गुणविशेष पू. बाबांच्या सान्निध्यात अनुभवास येत असत. आपण कोणी इतरांपेक्षा वेगळे आहोत, संत, महात्मा, महाराज, गुरु असे कोणतेही वैशिष्ट्य पू. बाबांच्या विहारात नसे. कुटुंबात, समाजात एकमेकांशी जशी वागणूक असावी, तशीच त्यांची वागणूक असे. कोणाचे घरी गेल्यावर तेथे जशी व्यवस्था असेल त्याप्रमाणे ते समरस होत. सुखवस्तु कुटुंबातील गोड पदार्थ ज्याप्रमाणे सेवन करीत तसेच गरीबाचे घरी शिळा पदार्थ उरलेला असल्यास कोणी न सांगता स्वतःच शोधून काढ़ून सर्वांबरोवर आपणही खात. अनपेक्ष जीवन कसे असावे याचे प्रात्यक्षिक त्यांचे रूपाने वावरत होते.

पू. बाबामहाराज आर्वीकर यांच्याबद्दल संक्षिप्त माहिती देणारा लघुपट पहा...

मराठी

English

प. पू. बाबामहाराज आर्वीकर यांचे अलौकिक ग्रंथसंपदा...

पू. बाबांच्या अलौकिक ग्रंथांबद्दल जाणून घेण्यासाठी एक छोटा व्हिडिओ पहा.

देणगी

नवीन प्रकाशने, पुनर्मुद्रण, पू. बाबांच्या विचारांचे प्रसार आणि प्रचार यासाठी कार्यक्रम नियोजन इत्यादी.  

जोडले रहा!

आपला ईमेल अ‍ॅड्रेस आमच्याशी शेअर करा जेणेकरून जेव्हा नवीन ब्लॉग्स, पुस्तके आणि ऑडिओ उपलब्ध होतील, तेव्हा आम्ही आपल्याला अपडेट करू शकू!

ब्लॉग

Terms & Conditions

Privacy Policy

Accessibility Statement

©2035 by Shashwat Sangati. Powered and secured by Wix

bottom of page