जीवनपट
जन्म
आर्वी,
श्रावण शु.१४ शके १८४७
दि. ३ ऑगस्ट, १९२५, सोमवार, सायं. ६.३० वा.
१९२५
शालेय जीवनात संस्कृत गुरुगीतेची मराठीत रचना.
मॅट्रिकच्या वर्गात शिकत असताना १६ व्या वर्षी वडिल श्री. प्रभाकरपंत यांचे निधन.
घर व आर्वी सोडली.
१९४१
पंढरपूर, नाशिक, ओंकारेश्वर, नेपाळ, हिमालय, जगन्नाथपुरी, गाणगापुर, नागपूर, अक्कलकोट येथे समाज स्थितिचे निरीक्षणार्थ व कार्य नियोजनार्थ भ्रमण.
संत तुकडोजी महाराजांचा सहवास व त्यांच्या कार्यात सहभाग.
१९४२ ते १९५३
(अंदाजे)
अक्कलकोट - वटवृक्ष मंदिरात पू.बाबांची सप्ताहभर प्रवचने. त्याम ुळे अचानक प्रसिद्धी.
निंबाळला जाऊन गुरुदेव रानडे यांची भेट.
१९५४
श्रीस्वामीसमर्थांच्या (अक्कलकोट) आदेशानुसार माचणुरात आगमन.
चातुर्मास समाप्ती उत्सव आयोजन.
१९५५
चैत्र महिन्यात मुंबईच्या वास्तव्यात तीन दिवसांत श्रीरामजन्माख्यानचे लेखन. त्यानंतर प्रार्थना प्रभात, प्रभात पाठ, आचार संहिता या पुस्तिकांचे प्रकाशन. आळंदीत वास्तव्य व ज्ञानाईच्या आदेशाने अवघ्या अकरा दिवसात ‘साधनासंहिता’ हा अलौकिक ग्रंथ लिहून पूर्ण.
माचणूर येथे पहिला साधना सप्ताह महोत्सव.
१९५६
दुसरा साधना महोत्सव दादर लक्ष्मीनारायण बाग, येथे. दि. २२-१-५७ ते २७-१-५७.
१९५७
पू. बाबांची मुंबईत व उपनगरांत प्रवचने.
पू. बाबा १९५८ पासून प्रत्येक मुंबई वास्तव्याच्या वेळी भिकोबा निवासात राहू लागले.
१९५८
श्रीसंतस्मृति महोत्सवाचे आयोजन प्रथम वर्ष पुणे येथे. दि. १-५-६० ते ८-५-६०.
जुलै महिन्यामध्ये शिष्यांबरोबर पू. बाबांचे वृंदावन यात्रेला प्रयाण.
१९६०
संतधर्म प्रसारक मंडळाची स्थापना. दि. ८-९-६२.
१९६२
पू. बाबांनी भगवद्गीतेचे पहिले दोन अध्याय व तिसऱ्यातील काही श्लोक यांचे विवेचन करणारी ७५-८० पत्रे (ऑक्टोबर ६३ ते जून ६५) लिहिली.
१९६३
ज्ञानदेवांच्या हरिपाठाचे रहस्य प्रकट करणारे लेखन.
१९६४
दिव्यामृतधारा या ग्रंथाचे लेखन पू. बाबांनी १९६५ च्या चातुर्मासात सुरु केले.
१९६५
दिव्यामृतधारा खंड पहिला, राष्ट्रीय पंडित खुपेरकरशास्त्री यांच्या हस्ते प्रकाशित झाला.
वेदमूर्ती श्री.दा.सातवळेकर यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त पारडीला गमन. सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली अभिष्ट चिंतनपर भाषण.
१९६६
पू. बाबांचे इंदोरला प्रयाण. विविध साहित्य संस्थांच्या वतीने 'मधुरा भक्तीवर' त्यांची प्रवचने झाली.
१९६७
शिष्यांबरोबर उत्तर भारत यात्रा.
श्रीकृष्णजयंतीला सांगाति या त्रैमासिकाचा शुभारंभ.
अखिल भारतीय धर्मोत्सव सभेची स्थापना.
१९६८
हुपरी येथे विठ्ठलमूर्तीची प्रतिष्ठापना.
सिद्धसारणा संघाची स्थापना.
१९७०
हुपरी येथे रामनवमी महोत्सव. विठ्ठल मंदिर बांधण्यात आले.
राष्ट्रीय स्वयंसंघाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी सोलापुरात येवून पू. बाबांची भेट घेतली.
शक्तिपात दीक्षेचे अध्वर्यु श्री. गुळवणी महाराज यांनी सोलापुरात येऊन पू. बाबांची भेट घेतली.
१९७१
डिसेंबर २, गुरुवार, सकाळी ९ वा. २० मि. पू. बाबामहाराजांचे मोक्षधाम, माचणूर येथे महानिर्वाण. (मार्गशिर्ष पौर्णिमा. शके १८९३.)
