top of page
पू. बाबामहाराजांचे पू. गुरुदेव रानडे यांबरोबर दिव्य नाते

पू. बाबा दोन वेळा पू. गुरुदेव रानडे यांचेकडे गेले. प्रथम भेटीत निंबाळला पू. बाबांचे भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायावर 'विश्वरूप दर्शनावर' प्रवचन झाले. याप्रसंगी पू. रानडे यांनी पू. बाबांना कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर वास्तव्य करावे असे विनविले. पू. बाबांनी उत्तर दिले "काय परमेश्वराची इच्छा असेल तसे होईल ! मी काय ठरविणार !"
त्यानंतर पू. बाबा पुन्हा एकदा निंबाळला पू. गुरुदेवांकडे गेले होते. त्यावेळी पू. बाबांनी 'नवविधाभक्तियोगाचे' वाचन केले. आत्मसाक्षात्कारी दोन सत्पुरुषांचा अध्यात्मिक संवाद, भक्तियोगावरील मार्मिक अनुभूतीची प्रश्नोत्तरे झाली. ज्यांना ती ऐकावयास मिळाली ते खरोखरीच धन्य होत.
bottom of page
