पू. बाबामहाराजांचे स्वामी स्वरूपानंदांशी दिव्य नाते

आधुनिक काळांतील पू. बाबामहाराजांचे समकालीन नाथसंप्रदायी थोर संत पावसचे स्वामी स्वरुपानंद जरी प्रत्यक्षात पू. बाबांना भेटले नसले तरी स्वामी स्वरूपानंदांचे पू. बाबांशी ऋणानुबंध होते हे स्वामींनी पू. बाबांना “सांगाति” या मासिकाच्या वेळी पाठविलेल्या शब्दांकित शुभेच्छांवरून लक्षात येते. स्वामी स्वरूपानंद लिहितात:
"स. न. वि. वि. -
तुमचें दि. ११-४-६८ चें पत्र पोहोचलें. आत्मचिंतन- नामसंकीर्तन-लेखन-प्रवचनादि नाना साधनांच्या द्वारा, समाजांतील सत्प्रवृत्ति वाढीस लावणें येवढेच आपलें ईश्वर- नियोजित कार्य ! आपण त्याचें स्मरण करीत तें यथाशक्ति, यथामति पार पाडूं या.
आपल्या त्रैमासिक प्रकाशनाच्या संकल्पित कार्यांत आपणा सर्वांस सुयश लाभावें, अशी प्रभूचरणीं प्रार्थना करतो.
तुम्हां सर्वांचा आत्मतृप्त,
स्वरूपानंद”
स्वामी आपल्या शिष्यांना सांगत की दिव्यामृतधारा हा ग्रंथ नीट समजेपर्यंत वाचा कारण संपूर्ण नाथसंप्रदायाचे रहस्य संत बाबामहाराज आर्वीकरांनी या दिव्य ग्रंथांत प्रगट केलेले आहे.
